
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
92 देशांच्या आपल्या दौऱयांवर सुमारे 2 हजार कोटींचा चुराडा केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने तीन वर्षांत देशभरातील वृत्तपत्रांमधील जाहिरातबाजीवर तब्बल 1800 कोटी रुपये उधळले आहेत. ही माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री राज्यवर्धन राठोड यांनीच लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरादाखल दिली आहे.
ब्युरो ऑफ आऊटरीच ऍण्ड कम्युनिकेशन (बीओसी) ही त्यांच्याच खात्याच्या अखत्यारीतील केंद्र सरकारची नोडल एजन्सी आहे. ती विविध खाती आणि सरकारी उपक्रमांसाठी प्रचाराचे काम करते. 2015-16 या वर्षात 579.88 कोटी रुपये, 2016-17 या वर्षात 579.88 कोटी रुपये, 2017-18 या वर्षात 648.82 कोटी रुपये केवळ प्रिंट मीडिया म्हणजे वृत्तपत्रांतील सरकारी जाहिरातींवर खर्च करण्यात आलेत, असे राठोड यांनी सांगितले.

























































