
सामना ऑनलाईन । पणजी
गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे राष्ट्रीय दुखवट्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीसह देशभरातील राज्य आणि केंद्रशासीत प्रदेशांच्या राजधानीत सोमवारी हिंदुस्थानचा राष्ट्रध्वज तिरंगा अर्ध्यावरच राहणार आहे. याबाबत पीआयबीचे महानिर्देशक सीतांशु कर यांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे.
Centre announces national mourning tomorrow following the demise of CM of Goa, Shri Manohar Parrikar. National Flag will fly at half-mast in the National Capital & capitals of States and UTs. State funeral to be accorded to Shri Parrikar. Union Cabinet to meet at 10 am tomorrow.
— Sitanshu Kar (@DG_PIB) March 17, 2019
पर्रीकर यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने देशभरात सोमवारी एक दिवसाच्या राष्ट्रीय दुखवट्याची घोषणा केली आहे. भाजपने सोमवारी होणाऱ्या पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीसह पक्षाचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. तर गोवा सरकारकडून गोव्यात सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे गोव्यात सोमवारी सर्व शाळा, महाविद्यालये बंद राहणार असून 18 मार्च रोजी होणाऱ्या गोवा बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.
























































