महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याचे सोन्याचे गंठण तोडून नेले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कोपरगाव

रात्रीच्या सुमारास घराबाहेर फिरत असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याचे सोन्याचे गंठण तोडून चोरून नेल्याची घटना घडली असून कोपरगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवारी रात्री दहा सव्वादहाच्या सुमारास धारणगाव रस्त्यावरील नागरे पेट्रोल पंपाजवळील जोशी नगर कॉलनीत राहणाऱ्या मिना बाळासाहेब तंटक (५०) घराच्या बाहेर फिरत असतांना मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याचे 50 हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण तोडून चोरून नेले. याबाबत त्यांनी कोपरगाव शहर पोलिसात तक्रार दिली असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. घटनास्थळास शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर, पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे, पो. ना. दारकुंडे यांनी भेट दिली.