
पंजाब-हरियाणाची राजधानी चंदीगडमध्ये ‘आयफोन लंगर’वर बंदी घालण्यात आली आहे. मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी लोक जमा होतील आणि चेंगराचेंगरीचे शक्यता असल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे.
चंदीगडचे पोलीस उपायुक्त निशांत यादव यांनी येत्या 22 सप्टेंबरला चंदीगडमध्ये होणाऱ्या आयफोन लंगरला परवानगी देऊ नका, असे निर्देश पोलिसांना दिले आहेत. या कार्यक्रमाची घोषणा अमृतसरला राहणारे व्यावसायिक राकेश त्रेहान याने सोशल मीडियात केली होती. तो ‘राजा डी’ या नावाने सोशल मीडियावर घोषणा करतो. घोषणेमध्ये त्याने दावा केला होता की, तो 22 सप्टेंबर रोजी चंदीगड आणि मोहालीमध्ये आयफोन 17 आणि त्यापुढील मॉडेल्स ‘प्रसाद’ म्हणून वाटणार आहे. मात्र असा कार्यक्रम रोखण्याचे निर्देश उपायुक्त निशांत यादव यांनी दिले आहेत. त्यांनी वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) यांना चंदीगडमध्ये असे कार्यक्रम करण्यापासून रोखण्यास सांगितले आहे. चंदीगडमध्ये अशा आयफोन लंगरवर बंदी घालण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.
























































