
चंद्रपूर जिल्हातील शेतीला पाण्याअभावी मोठा फटका बसला. पीक वाचवण्यासाठी बळीराजाची धळपळ सुरू आहे. धान पिकाला पाणी करणं गरजेचं झालं आहे. तर दुसरीकडे गावातील नळ योजना पाच दिवसापासून ठप्प पडली. पाण्यासाठी गाव दाहीदिशा भटकत होता. अशात गावातील अजय लिंगे या शेतकऱ्याने शेतीला सिंचन न करता गावाला पाणी देत आहे.
ही भीषण स्थिती आहे जिल्हातील गोंडपिपरी तालुक्यातील सकमूर, चेकबापूर गावातील. वर्धा नदी काठावर सकमूर, चेकबापूर गाव वसलं आहे. गावाला लागून नदीपात्र असलं तरी गावात पाणी प्रश्न टोकाचा. साधारणता वीस वर्षांपूर्वी पाणी प्रश्न सोडविण्यासाठी गावात प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आणल्या गेली. ही योजना ठेकेदारा मार्फत चालविल्या जाते. मात्र योजनेकडे ठेकेदाराचे कमालीची दुर्लक्ष झालं आहे. अधूनमधून ही योजना बंद पडत असते. मागील पाच दिवसापासून गावातील नळाना कोरड पडली आहे. पाण्यासाठी गावाची भटकंती सुरू आहे. गावातील शेताकऱ्याने शेतीला पाणी न करता गावाला पाणी पुरवठा करीत आहे.त्या पाण्यावर गाव तहान भागावीत आहे. गोंडपिपरी तालुका तसाही मागासलेला. तालुक्यात अनेक समस्या आहेत. मात्र पाण्यासाठी गावाची होणारी वाताहत येथील प्रसाशन, लोकप्रतिनिधीला दिसू नये, ही मोठी शोकांतिका ठरली आहे.

























































