
चंद्रपूरमधील राजूरा बसस्थानकावरील छतावर झाड कोसळून तीन विद्यार्थी जखमी झाले आहेत. सुदैवाने बस स्थानकात प्रवाशांची गर्दी कमी असल्याने मोठी दुर्घटना टाळली.
दरम्यान रविवारी चंद्रपूरमधील बल्लारपूर रेल्वे स्थानकावरील पादचारी पूलाला मोठे भगदाड पडले. या पुलावरून पडून 1 ठार तर 13 जण जखमी झाले आहेत.