Video – भाजी घेण्यासाठी चंद्रपुरात नागरिकांची झुंबड

जिल्हा प्रशासनाने उद्यापासून कडक असा जनता कर्फ्यु लावण्याचा निर्णय घेतला आहे.  त्यामुळे आज चंद्रपुरातील मुख्य भाजी बाजारात तुफान गर्दी उसळली. 21 ते 25 आणि 28 ते 1 मे पर्यंत सर्व किराणा, भाजी, फळांची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  26 आणि 27 ला केवळ दोन दिवस ही दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे भाजीपाला आणि किराणा साठवून ठेवण्यासाठी  आजचा एक दिवस हातात असल्याने नागरिक बाजारात गर्दी करू लागले आहेत.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारात आज सकाळपासूनच लोकांनी गर्दी केली.  कोरोनासंदर्भातील नियमांची पायमल्ली करीत लोक भाजीसाठी तुटून पडल्यासारखे चित्र इथं होतं.  बहुतांशी लोक मास्कविना फिरत होते, तर अनेकांनी मास्क हनुवटीवर उतरवला होता.  एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असताना, आरोग्य यंत्रणा हतबल झाली असताना,  केवळ भाजीपाल्यासाठी लोकांची ही झुंबड संकट गडद करणारी ठरू शकते.

आपली प्रतिक्रिया द्या