
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सचिवांनी चुकीचे मार्गदर्शन केल्याने मी अजित पवारांशी मोठय़ा आवाजात बोललो, असे सांगत मंत्री छगन भुजबळ यांनी दोघांमध्ये झालेल्या वादाची कबुलीच देवून टाकली.
नाशिक येथे शनिवारी भुजबळ प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत मी गायकवाड आयोगाचा हवाला देत ओबीसी आरक्षणाची आकडेवारी सांगितली. आरक्षणानुसार नोकरीतील अनुशेष भरून काढण्याचीही मागणी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शेजारी बसलेल्या सचिवांनी अशी माहिती नसल्याचे चुकीचे मार्गदर्शन पवारांना केले, अशी माहितीच नाही, असे तेही म्हणाले.
बिंदुनामावलीनुसार नोकरभरती होत असल्याने सरकारकडे माहिती आहेच, असे ठामपणे सांगत मी अजित पवारांशी मोठय़ाने बोललो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली, असे सांगत भुजबळांनी वादाची कबुलीच दिली. ही बोलचाल म्हणजे आम्हा दोन भावातील चर्चा आहे. आपली बाजू मांडण्यासाठी मोठय़ाने बोलले जाते, ती वादावादी पिंवा भांडण नसते. तो विषय संपलेला आहे, अशी सारवासारव करतानाच भुजबळांनी अजित पवारांना उघडेही पाडले.

























































