
मागील वर्षी जुलै महिन्यात पूरस्थितीमुळे चिपळूण येथील अपरांत रुग्णालयात मृत्युमुखी पडलेल्या आठ कोविड रुग्णांच्या नातेवाईकांना विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्येकी चार लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे. ही मदत राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून केली जाईल.
21 आणि 22 जुलै 2021 रोजी पूर आल्याने अपरांत रुग्णालयाच्या कोरोना केंद्रात आठ कोविड रुग्णांचा मृत्यू झाला होता व रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत या मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदतीची विनंती करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून विशेष बाब म्हणून आर्थिक मदतीची घोषणा केली.

























































