चीनचा नवा डाव; सीमेवर वाजवली पंजाबी गाणी

1107
प्रातिनिधीक फोटो

हिंदुस्थान आणि चीनमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये तणाव वाढत गेल्याचे पाहायला मिळाले आहे. सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने आता एक डाव खेळला आहे. चीनने फिंगर -4 क्षेत्रात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर लाऊड स्पीकर बसवले आहेत. या लाऊड स्पीकरवर चीन पंजाबी गाणीही वाजवत आहे. चीन आता लाउडस्पीकरच्या माध्यमातून हिंदुस्थान सैनिकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले जात आहे.

एएनआय यावृत्तसंस्थेनुसार, चिनी सैन्याने फिंगर -4 भागात लाउडस्पीकर बसवले आहेत. चिनी सैन्याने ज्या ठिकाणी लाउडस्पीकर बसविले आहेत त्या भागात 24×7 हिंदुस्थानी सैनिकांची देखरेख सुरू असते. अशावेळी चीन सैन्याचे लक्ष विचलित करण्यासाठी किंवा दबाव आणण्यासाठी अशी हालचाल करत आहे. हिंदुस्थानातून तैनात केलेल्या सैन्यात शिख सैनिक बांधवांचा देखील समावेश आहे. त्यामुळे पंजाबी गाणी वाजवून चिनी सैन्य मानसिक दबाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.

फिंगर -4 क्षेत्र असे एक क्षेत्र आहे जिथे हिंदुस्थान आणि चीनच्या सैन्यातील अंतर कमी असून संघर्ष होण्याची परिस्थिती अधिक असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी 8 सप्टेंबर रोजी दोन्ही बाजूंनी या भागात जोरदार गोळीबार झाला होता. दोन्ही बाजूंच्या सैनिकांमध्ये 100 हून राउंड गोळ्या झाडाल्या गेल्या. पूर्व लडाखच्या भागात 20 दिवसांत हिंदुस्थान आणि चीनी सैनिकांमध्ये किमान तीन गोळीबारांच्या घटना घडल्या आहेत.

सैन्याच्या सूत्रांनी सांगितले की, 29 ते 31 ऑगस्ट दरम्यान दक्षिणेकडील पँगाँग भागातील उंच टेकड्यांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न होता. मात्र हिंदुस्थानी सैनिकांच्या दक्षतेमुळे चीनचे हे प्रयत्न यशस्वी ठरले नाही. तर दुसरी घटना 7 सप्टेंबर रोजी मुखापरी जवळ घडली. लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की तिसरी घटना 8 सप्टेंबर रोजी पँगाँग तलावाच्या उत्तरेकडील किनाऱ्याजवळ घडली. त्यावेळी सैनिकांनी 100 हून अधिक राऊंड फायर केल्या. कारण चिनी सैन्य आक्रमकतेने ताबा मिळवच्या तयारीत होते.

हिंदुस्थानचे परराष्ट्रमंत्री शांघाय सहकार संघटनेच्या बैठकीसाठी मॉस्कोला गेले असताना आणि सीमाप्रश्नावर चर्चा करण्यासाठी चीनच्या आपल्या समकक्ष अधिकाऱ्यांशी भेट घेत असतानाच ही घटना घडली. चर्चेनुसार दोन्ही बाजूंनी मुख्य कमांडर-स्तरीय चर्चेचे आयोजन केले होते, परंतु अद्याप चीनच्या बाजूने तारीख व वेळ निश्चित केली गेली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या