जयंत पाटील- छगन भुजबळांच्या खात्यात अदलाबदल

839

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळातील जयंत पाटील व छगन भुजबळ यांच्याकडील काही खात्यांमध्ये बदल केले आहेत. छगन भुजबळ यांच्याकडे जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास हे खाते हाते, तर जयंत पाटील यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा, अल्पसंख्याक विकास आणि कल्याण ही खाती सोपविण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार यात बदल करण्यात आला असून पाटील यांच्याकडे जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास, तर भुजबळांकडे अन्न व नागरी पुरवठा, अल्पसंख्याक विकास ही खाती देण्यात आली आहेत

आपली प्रतिक्रिया द्या