
सामना प्रतिनिधी । जळगाव
ग्रामीण जनतेचा सर्वांगीण विकास हा रस्ते विकासावरच अवलंबून असतो याची जाणीव ठेवून शिवसेना उपनेते तथा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांतून व पाठपुराव्या मुळे जळगाव व धरणगाव तालुक्यात रस्ते देखभाल दुरुस्ती अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या योजनेतर तरतुदी मधून 46 कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे डांबरी नूतनीकरण व मजबुतीकरणासाठी तसेच 900 मीटर रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाकरिता 10 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून तरतूदही करण्यात आली आहे. मतदारसंघात रस्त्यांच्या होत असलेल्या विकासामुळे पक्या रस्त्यांचे जाळे विणले जात आहे. यामुळे राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्यावर मतदार समाधानी दिसत आहे.
या 10 कोटी रूपयांच्या निधीतुन जळगाव तालुक्यातील लामांजन – म्हसावद रस्ता प्रजिमा 39 – 3 किमी – 60 लक्ष , आमोदा – विदगावं रस्ता प्रजिमा 58 – 6 किमी तर भोलाने – कानसवाडे – शेळगाव – 6 किमी या रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे- 2 कोटी 20 लक्ष , फुपनी – नदगाव प्रजिमा 04 या रस्त्याच्या फुपनी गावाजवळ 350 मिटरचे काँक्रीटीकरण करणे – 35 लक्ष , रा.मा. 42 – सूनसगाव – वराड प्रजिमा 35 मधील वराड – सूनसगाव या 1.5 कि.मी. च्या रस्त्याचे डांबरीकरण करणे – 30 लक्ष , शेळगाव – कडगाव रस्ता प्रजिमा 27 कडगाव गावाजवळच्या ५०० मीटर लांबीचे काँक्रीटीकरण करणे – 25 लक्ष , भोलाणे – कानसवाडे 1.5 किमी रस्ता व नशिराबाद – बेळी 1.5 किमी तसेच वराड – पाथरी प्रजिमा 08 – 6 किमी या रस्त्याचे डांबरीकरण करणे – 80 लक्ष याप्रमाणे जळगाव तालुक्यात एकूण 25 किमी रस्त्यांचे डांबरीकरण व मजबुतीकरण व काँक्रीटीकरण करण्यासाठी ही कामे मंजुर झाली आहेत. तर धरणगाव तालुक्यातील धरणगाव – सोनवद – जामोद रस्ता प्रजिमा 58 मधील सोनवद ते जामोद या 04 किमी रस्त्याचे डांबरीकरण करणे – 1 कोटी 25 लक्ष , बांभोरी प्र चा – गिरणा नदी पर्यंत 2.5 किमी रस्त्याचे डांबरीकरण व मजबुतीकरण करणे – 1 कोटी 25 लक्ष ,पिंपळे – विहिर फाटा – नारणे – 4 किमी व बाभूळगाव – सोनवद – 03 किमी रस्ता प्रजिमा 52 या रस्त्याचे डांबरीकरण करणे – 1 कोटी , जांभोरा – धरणगाव तालुका हद्द रस्ता प्रजिमा 51 लांबी – 03 किमी – 1 कोटी 20 लक्ष तसेच झुरखेडा – विहिर फाटा – वाकटुकी रस्ता प्रजिमा 57 रस्त्याचे डांबरीकरण करणे – 06 किमी -90 लक्ष असे 21 किमीच्या रस्त्यांच्या मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी मंजूरी मिळाली आहे. जळगाव तालुक्यात साडे चार कोटी तर धरनगाव तालुक्यात 5 कोटी 50 लक्ष असा एकूण मतदारसंघात 10 कोटींचा निधी सहकार राज्यमंत्री पाटील यांच्या प्रयत्नांतून मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे मतदारसंघात पक्क्या रस्त्यांचे व लहान मोठया पुलाचे जाळे तयार होत आहे. रस्त्यांमुळे नागरिकांना विशेषतः शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
राज्यमंत्र्यांची अधिकाऱ्यांशी चर्चा
लोकसभा निवडणुकीच्या आचार संहिता लागण्या अगोदर यापूर्वी मंजूर झालेल्या व सदर कामाची निविदा प्रक्रिया तात्काळ करून कामांचे वर्क ऑर्डर मुदतीत करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी सविस्तर चर्चा केली. प्रत्यक्ष कामांना सुरुवात करण्यासाठी दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही अशी तंबीही ना. पाटील अधिकाऱ्यांशी चर्चा करतेवेळी दिली.

























































