स्टार प्रचारक यादीतून हटवण्याचा तुम्हाला अधिकार नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
supreme-court-of-india

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे नाव काॅंग्रेसच्या स्टार प्रचारक यादीतून हटवण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. निवडणूक आयोगाला स्टार प्रचारकाचा दर्जा काढून घेण्याचा किंवा राजकीय पक्षांच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून नाव वगळण्याचा अधिकार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

मध्य प्रदेशातील पोटनिवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाने कमलनाथ यांचा स्टार प्रचारकाचा दर्जा रद्द केला होता. आयोगाच्या या निर्णयाला कमलनाथ यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

दरम्यान, प्रचार संपुष्टात आला असून कमलनाथ यांची याचिका निष्प्रभावी झाल्याचे मत निवडणूक आयोगाने न्यायालयासमोर मांडले. यावर, आम्ही हे प्रकरण व्यापक पद्धतीने पाहू. हे तुमच्या अधिकारक्षेत्रात येत नाही, असे स्पष्ट करत सर्वेच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला उत्तर देण्यासाठी नोटीस दिली आहे.