Video – राहुल गांधी रमले शेतीत; पेरणी करत ट्रॅक्टरही चालवला

काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या जनतेते मिसळत आहेत. त्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढत आहे. याआधी त्यांनी एका ट्रकमधून प्रवास करत ट्रक चालकांच्या अडचणी जाणून घेतल्या होत्या. आता ते शेतकऱ्यांसोबत शेतात रमले आहेत. त्यांची शेतकऱ्यांची मदत करत शेतात पेरणी केली. तसेच ट्रॅक्टरही चालवला. याचा व्हिडीओ त्यांनी त्यांच्या युट्यूब चॅनेलवर शेअर केला आहे.

हा व्हिडीओ सोनीपतच्या मदीना गावातील आहे. राहुल गांधी हिमाचल प्रदेशात जात असताना ते या गावात थांबले होते. तेथे त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांना शेतातील कामात मदत केली. याचा व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओला त्यांनी ‘धान की रोपाई, मंजी पर रोटी- किसान हैं’ असे कॅप्शन दिले आहे. राहुल यांनी शेतात शेतकऱ्यांसोबत पेरणी केल्याचे दिसत आहे. तसेच शेतात त्यांनी ट्रॅक्टरही चालवला. तसेच शेतकऱ्यांशी पीकपाण्याबाबत चर्चा करत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर शेतकरी महिलांना बनवलेली रोटी आणि भाजीचा आस्वादही घेतला. शेतकरी हेच खरी देशाची शक्ती असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.