
सामना ऑनलाईन । मुंबई
कोणतीही नोटीस न देता मेडिक्लेम पॉलिसीचा हप्ता वाढवून पैसे उकळणाऱ्या द न्यू इंडिया ऍश्युरन्स कंपनीला ग्राहक न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. फसवणुकीप्रकरणी कंपनीने उकळलेले अतिरिक्त 18 हजार 837 रुपये परत देण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून नुकसानभरपाईपोटी साडेसात हजार आणि खटल्यासाठी पाच हजार रुपये देण्यासही कंपनीला बजावले आहे. पर्सी अंकलेसरीया यांची द न्यू इंडिया ऍश्युरन्स कंपनीमध्ये मेडिक्लेम पॉलिसी असून कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता पॉलिसीच्या हप्त्यात वाढ केली. ही वाढीव रक्कम परत मिळावी यासाठी दोनवेळा कंपनीसोबत पत्रव्यवहारही केला, परंतु कंपनीने ते पैसे परत करण्यास नकार दिल्यामुळे दाद मागण्यासाठी पर्सी यांनी ग्राहक न्यायालयात धाव घेतली.



























































