काँग्रेसने ‘द्रौपदी वस्त्रहरण’चे वादग्रस्त पोस्टर झळकावले; राहुल गांधींच्या माफीची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

तेलंगनामध्ये विरोध प्रदर्शनादरम्यान झळकावण्यात आलेल्या एका पोस्टरमुळे भाजप आणि काँग्रेस आमने-सामने आली आहे. तेलंगाना काँग्रेने निवडणूक आयोगावर निशाणा साधण्यासाठी ‘द्रौपदी वस्त्रहरण’चे वादग्रस्त पोस्टर झळकावले. या पोस्टरद्वारे काँग्रेसने हिंदू महिलांचा अपमान केल्याचा आरोप भाजपने केला असून या प्रकरणी राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात आली आहे.

काँग्रेसने झळकावलेल्या पोस्टरमध्ये लोकशाहीला द्रौपदी व धृतराष्ट्राला निवडणूक आयोगाच्या रुपात दाखवण्य़ात आले आहे. निवडणूक आयोगाचा एजंट (दुशासन) लोकशाहीची (द्रौपदी) साडी ओढताना दिसत आहे. काँग्रेसने निवडणूक आयोगाने लोकशाहीचे शोषण केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या पोस्टरमध्ये दुशासनाला निवडणूक आयोगाचा एजंट दाखवण्यात आले आहे. पोस्टरमुळे सध्या वाद भडकला आहे.

यापूर्वी तेलंगना काँग्रेसच्या निवडणूक समितीचे चेअरमन एम. शशिदरे यांनी सांगितले की, निवडणूक आयोगासमोर इव्हीएम मशीन आणि मतदान यादीमध्ये घोळ असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. परंतु यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे आम्ही आता पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचे ते म्हणाले.