
विजय जोशी । नांदेड
‘हिंदूंच्या मुलींना आमिषे दाखवून त्यांचे धर्मांतर करायचे आणि त्यांच्यावर अत्याचार करायचा हाच लव्ह जिहादचा मुख्य हेतू आहे. लव्ह जिहादचे प्रकार नांदेड जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर होत आहेत. आता हिंदू युवकांनी संघटीत होऊन लव्ह जिहादचे षडयंत्र करणाऱ्यांना ठेचून काढले पाहिजे’, अशा शब्दात श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजासिंह ठाकूर यांनी येथे आवाहन केले.
हिंदुंना संपवण्याची भाषा करणाऱ्यांसमोर शपथ घेणार नाही, राजा सिंह यांचा एल्गार
कायदे हे फक्त हिंदूंसाठी आहेत आणि त्याचे फायदे अल्पसंख्यांकांना मिळत आहेत. हे आम्ही चालू देणार नाही. याचे उदाहरण देताना ते म्हणाले की, आमच्या दिवाळी, होळी, गणेश उत्सव अशा सणांना ध्वनीप्रदूषणाच्या नावाखाली प्रतिबंध करण्यात येतो आणि मशिदीवरील भोंगे वाजत असताना त्याबाबत मात्र न्यायालय आणि सरकार काहीच करत नाही हा पक्षपात आम्ही सहन करणार नाही. ज्या भागात मशिदीवरील भोंगे बंद होत नाहीत त्या भागातील हिंदू नागरिकांनी पोलिसात तक्रार करावी आणि मुस्लिमांना वठणीवर आणावे, असेही राजासिंह म्हणाले.
बाजारात कोणतीही वस्तू खरेदी करताना दुकानदाराने टिळा लावला आहे की नाही हे पहा आणि टिळा लावलेल्या दुकानदाराकडूनच खरेदी करा. गोल टोपीवाल्या व्यापाऱ्याकडे हिंदूंनी फिरकूही नये, असे आवाहनही त्यांनी केले. काही इंग्रजी शाळांमध्ये मुलींना टिकली लावण्यास आणि मुलांना गंध लावण्यास प्रतिबंध केला जातो याबाबत नांदेडच्या युवकांना मी मागे सांगितले होते की, त्यांनी नांदेडमधील ग्यानमाता शाळेच्या प्रशासनाला आपला हिसका दाखवून वठणीवर आणले आहे. याचे मला समाधान वाटते, असेही ते म्हणाले.

























































