वाळू घाटांचा लिलाव रखडल्याने वाळूचे भाव वाढले

सेलू तालुक्यातील एकाही वाळू घाटाचा लिलाव अद्यापपर्यंत झाला नसल्याने तालुक्यात गुजरातमधून वाळू येत आहे. मात्र, याचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहरचे आहेत. तालुक्यात वाळू घाटांचा लिलाव झाला नसल्याने गुजरातमधून येणाऱ्या वाळूला सोन्याचा भाव मिळत आहे. वाळूच्या वाढलेल्या दरामुळे सर्वसामान्यांना बांधकाम करणे कठीण होत असून घरकुलांची कामे रखडली आहेत.

कोरोना संकटामुळे तालुक्यातील एकाही वाळू घाटाचा लिलाव झालेला नाही. त्यामुळे वाळूचा तुटवडा जाणवत आहे. वाळूअभावी बांधकामे अर्धवट आहेत. अनलॉक सुरू झाल्यानंतर काही ठिकाणे बांधकामे सुरू झाली आहेत. मात्र, वाळू मिळत नसल्यामुळे गुजरातमधील तापी, नर्मदा नदीतील काढण्यात येणारी वाळू मागवण्यात येत आहे. ती वाळूचे दर जास्त आहेत. सुमारे 2 हजार रुपये टनाने ही वाळू विक्री होत असल्याने सर्वसामान्यांना बांधकाम करणे आवाक्याबाहेरचे आहे. प्रधानमंत्री व रमाई योजनेतील घरकुलांची कामेही थांबली आहेत. मात्र, काहीजण नाइलाजास्ताव गुजरातमधून वाळू मागवत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या