…तर कोरोना प्रतिबंध नियमांमध्ये शिथिलता आणण्याचा प्रयत्न – अजित पवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील कोरोना संक्रमणाचा आढावा घेण्यात येतो. काल झालेल्या बैठकीतही हा आढावा घेण्यात आला. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली.

विदर्भातील एक जिल्हा सोडल्यास राज्यात कोरोना रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. देशात रुग्णसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य चौथ्या क्रमांकावर आहे, असे पवार म्हणाले.

रुग्णसंख्येत अशीच सातत्याने घट होत राहिल्यास मुख्यमंत्री महोदयांच्या संमतीने राज्यातील कोरोना प्रतिबंध नियमांमध्ये शिथिलता आणण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.