कोरोनाबाबत दिशाभूल करणाऱ्या जाहिरातदारांवर कारवाई करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनासंदर्भांत शासन व्यापक प्रमाणात जनजागृती करीत आहे. विविध वस्तूंची निर्मिती करणारे काही उत्पादक आणि जाहिरातदार विशिष्ट प्रकारच्या गादीचा/सोफ्याचा वापर केल्यास पिंवा विशिष्ट आयुर्वेदिक औषधांचे सेवन केल्यास कोरोनापासून प्रादुर्भाव होणार नाही, असा चुकीचा दावा करून नागरिकांची दिशाभूल करीत आहेत.  अशा उत्पादक आणि जाहिरातदारांवर व जाहिरात प्रक्रियेत भाग घेणाऱयांवर अन्न व औषध प्रशासनामार्फत गुन्हा दाखल करून त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिला आहे.

 कोणत्याही उत्पादकाने कोरोनावर औषधी उपाय असल्याचा दावा करणारी चुकीची जाहिरात केल्यास किंवा नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण केल्याचे दिसून आल्यास अशा उत्पादक, जाहिरातदार व जाहिरात प्रक्रियेत भाग घेणाऱयांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही डॉ. शिंगणे यांनी सांगितले आहे. कोरोनाबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहे. यासाठी सर्व शासकीय कार्यालये, महामंडळे, स्वायत्त संस्था दिवसरात्र कार्यरत आहेत. नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या जाहिरातीला बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

मुलुंडच्या शीतल आयुर्वेद भांडारवर करावाई

याबरोबर विशिष्ट आयुर्वेदिक औषधाचे सेवन केल्यास कोरोना विषाणूपासून वाचण्यासाठी रोगप्रतिरोधक औषधी अशा आशयाचा आक्षेपार्ह  मजपूर असलेली जाहिरात प्रकाशित केल्याबद्दल  अन्न व औषध प्रशासन विभागाने मुंबई येथील मुलुंड पोलीस ठाण्याला शीतल आयुर्वेद भांडार प्रा. लि. या औषध उत्पादन व विक्री पंपनीवर औषधे व जादुटोणा (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा 1954 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या कायद्यांतर्गत सहा महिन्यांपर्यंत कारावास पिंवा दंड किंवा दोन्हीची तरतूद आहे.

मुलुंडमध्ये 25 लाखांचे बनावट सॅनिटायझर जप्त

मुलुंड पश्चिमेकडील नाहूर इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये असलेल्या सिद्धिविनायक डायकेम प्रा. लि. या कंपनीवर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने आज धडक कारवाई केली. या कंपनीत विनापरवाना सॅनिटायझर बनविण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळताच सायंकाळी तेथे छापा मारण्यात आला. दरम्यान, 25 लाख किमतीचा बनावट सॅनिटायझरचा साठा जप्त करण्यात आल्याचे समजते. रात्री उशिरापर्यंत कारवाईची प्रक्रिया सुरू होती.

अन्न व औषध प्रशासनाकडून  गुन्हा दाखल

कोरोना विषाणूसंदर्भात अफवा पसरविल्याप्रकरणी तसेच जनतेची दिशाभूल केल्याप्रकरणी ठाणे जिह्यामध्ये भिवंडी येथील नारपोली पोलीस ठाणे येथे  एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरिहंत मॅट्रेसेसच्या मालकांनी 13 मार्च रोजी एका गुजराती दैनिकात ‘अरिहंत अॅर्ण्टी कोरोना व्हायरस मॅट्रेस’ या मॅट्रेसमुळे कोरोना विषाणूला प्रतिबंध होईल असे जनतेच्या मनामध्ये समजूत करून जनतेची दिशाभूल करणारी जाहिरात प्रसिद्ध केली. या मालकाविरुद्ध नारपोली पोलीस ठाण्यात औषधी द्रव्य व जादुटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.