#Corona लग्नाची वरात पोहोचली पोलीस ठाण्यात, मौलवीही ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अनेक लग्नसमारंभ देखील रद्द करण्यात आले आहेत. तर अगदीच गरजेचं असेल तरच परवानगी घेऊन पाच सहा नातेवाईकांच्या हजेरीत लग्न लावण्याचे आदेश देण्यात आले आहे. मात्र हे आदेश धुडकावून लावत लग्नासाठी निघालेल्या एका नवरदेवाला तुरुंगाची हवा खावी लागत आहे. या नवरदेवाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यासह त्याचे काही नातेवाईक व लग्न लावण्यासाठी आलेल्या मौलवींना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

उत्तराखंडमधील डेहराडूनमध्ये हा प्रकार घडला आहे. या तरुणाचा शुक्रवारी निकाह होणार होता. मात्र त्याची वरात लग्नाच्या मांडवात पोहोचायच्या आधीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यात मुलाकडच्या आठ नातेवाईकांचा व मौलवीचा समावेश आहे. ‘या तरुणाने लग्नासाठी पोलिसांची परवानगी घेतली नव्हती. तसेच त्याचे लग्न ज्या परिसरात होते त्या परिसरातील आठ जणांना क्वारंटाइईनमध्ये ठेवलं आहे. तो परिसर संवेदनशील परिसर आहे, असे डेहराडून पोलिसांनी सांगितले.