नारळाच्या करवंटीचा मास्क बनवून वापरणाऱ्याला पोलिसांनी पकडले

कोरोनाची लागण होऊ नये यासाठी मास्क वापरणं हे गरजेचं आहे. कोरोनाचे समूळ उच्चाटन अजूनही दृष्टीक्षेपात नसल्याने मास्कची सक्ती ही जवळपास सगळ्या देशांमध्ये लागू करण्यात आली आहे. नागरिकांना कोरोनाची लागण होऊ नये, त्यांचा जीव वाचावा यासाठई मास्कची सक्तीही करण्यात आली आहे. मास्क न वापरणाऱ्यांविरोधात कारवाई देखील केली जात आहे. मास्क वापरणं आवडत नसलेले लोकं यातूनही पळवाट काढण्याचा प्रयत्न करत असतात. एका माणसाने करवंटीचा मास्क बनवला आणि त्याला एक भोक पाडून शिट्टीही बसवून घेतली. या माणसाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला शोधून काढला आहे.

इंडोनिशियात राहणारा 44 वर्षांचा नेनगाह बुदिआसा हा पार्किंग तळावर काम करतो. मास्क लावल्याने त्याला शिटी वाजवता येत नव्हती. शिटी वाजवून वाहनांना मार्गदर्शन करणं हा त्याच्या कामाचा एक भाग आहे. मात्र नेनगाहला मास्कमुळे शिटी वाजवण्यात अडचण येत होती. यामुळे त्याने करवंटीचा मास्क बनवून त्याला तोंडाच्या इथे भोकपाडून शिटी बसवून घेतली होती.

पोलिसांना जेव्हा करवंटीच्या मास्कबद्दल कळालं तेव्हा त्यांनी नेनगाहला शोधून काढलं. नेनगाह याला नियम मोडायचा नव्हता मात्र शिटी वाजवण्यात अडचणी येत असल्याने त्याने हा जुगाड केला होता. यामुळे पोलिसांनी त्याला दंड ठोठावला नाही, मात्र त्याला शिक्षा म्हणून पुशअप्स मारायला सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या