सांगलीची चांगली बातमी! 4 कोरोनाग्रस्तांचा पहिला चाचणी अहवाल निगेटीव्ह

716

सांगलीमध्ये एकाच कुटुंबातील 25 जणांना कोरोनाची लागण झाल्याने जिल्हा प्रशासन हादरले आहे. इथे कोरोनाची लागण झाल्याचा संशय असलेले 4 नवे रुग्ण सापडले होते. या चारही जणांच्या घशातील द्रावचे नमुने पुण्याला तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. या चारही जणांच्या पहिल्या चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. हे चारही जण सध्या मिरजेतील रुग्णालयात दाखल आहेत. विशेष बाब ही आहे की यामध्ये 80 वर्षांच्या वृद्ध रुग्णाचा आणि 55 वर्षांच्या महिलेचाही समावेश आहे.

ज्या रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता त्यामध्ये दोन महिला (वय-55 आणि 36 वर्षे) आणि दोन पुरुषांचा (वय- 80 आणि 45 वर्षे) समावेश आहे. कोरोनाची लागण झाल्याचा संशय असलेल्या दोन महिलांपैकी एक महिला ही विदेशातून आली होती. 55 वर्षांच्या रुग्णाला कोरोना नाही तर न्यूमोनिया झाला असण्याची शक्यता पहिल्या चाचणी अहवालानंतर वर्तवण्यात येत आहे.

सांगली जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 25 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. हे सगळे जण एकाच कुटुंबातील असल्याचंही दिसून आलं आहे. 29 मार्च रोजी एका 2 वर्षांच्या मुलालाही कोरोनाची लागण झाल्याचं निदान करण्यात आलं होतं. या रुग्णाला सांगली जिल्ह्यातील सिव्हील हॉस्पिटलच्या आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आले आहे. गेल्या शुक्रवारी म्हणजे 27 मार्च रोजी सांगलीमध्ये एकाच दिवशी 12 रुग्ण आढळले होते. यामुळे सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 11 वरून थेट 23 वर पोहोचली होती. शुक्रवारी 12 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. शनिवारी म्हणजेत 28 मार्चलाही एका रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचे निदान करण्यात आले होते. सुरुवातीला सौदी अरेबियातून हाज यात्रेवरून परतलेल्या चार जणांना कोरोनाची बाधा झाली होती. हे चार जण ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात आले त्या सगळ्यांना कोरोनाची लागण होत गेली.

आपली प्रतिक्रिया द्या