कोरोना संशयित दोघा विदेशी नागरिकांची रवानगी लोणारच्या आयसोलेशन कक्षात

3595

कोरोना व्हायरस प्रभावित दोन संशयितांना आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आल्याची माहिती स्थानिक आरोग्य विभागाकडून मिळाली आहे.

लोणार येथे बाहेर देशातून आलेले दोघे कोरोना व्हायरस संशयित असून प्रथमदर्शी त्यांच्यात लक्षणे आढळून आल्याची माहिती आरोगय विभागाकडून मिळाली आहे. या संशयित दोघांना होम आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आले असून त्यांच्याकडून इतर प्रभावित होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरस प्रतिबंध उपाययोजना म्हणून आजपासून शहराच्या ठिकाणी सकाळी 6 ते रात्री 11 पर्यंत जमावबंदी मुंबई पोलीस अधिनियम 36(1)(3) अंतर्गत लागू करण्यात आली असून पोलीस निरीक्षण देशमुख यांनी नागरिकांना लाऊडस्पीकरद्वारे सूचना केल्या आहे. सुरक्षीततेच्या दृष्टीकोनातून नागरिकांनी सुचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आरोग्य विभागाकडून नागरिकांना दिवसातून वेळोवेळी हात स्वच्छ करण्याचे सुचविण्यात आले असून एकमेकांशी बोलताना एक मीटर अंतर ठेवण्याचे, तसेच शक्यतोवर गर्दीचे ठिकाण जसे बँक, बसस्थानक, सामूहिक कार्य या ठिकाणी जाण्याचे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या