रिझर्व्ह बँकेचा कारभार हॉटेलमधून!

2434

कोरोना विषाणूचा मोठा फटका जागतिक अर्थव्यवस्थेला बसला असून, हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम होणार आहे. यातून मार्ग काढण्यासाठी देशाची शिखर बँक ‘आरबीआय’च्या 150 उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची स्पेशल टीम एका हॉटेलमध्ये तळ ठोकून आहे. या हॉटेलचा पत्ता ‘सिक्रेट’ ठेवण्यात आला आहे. एक प्रकारे आरबीआयचा कारभार हॉटेलमधून सुरू आहे.

गेल्या वर्षभरापासून देशात आर्थिक मंदी आहे. अनेक उद्योग आर्थिक संकटात असल्याने कामगारकपात केली आहे. बेरोजगारीने 45 वर्षांतील उच्चांक गाठला आहे. 2020-21 या र्आिथक वर्षात जीडीपी 5 ते 5.50 टक्के एवढाच राहण्याचा अंदाज आहे. एकीकडे मंदीचे हे चित्र असताना कोरोना महामारीचे खूप मोठे संकट आले आहे. लोकांच्या सुरक्षेसाठी सर्व व्यवहार बंद करणे अत्यावश्यक आहे. यातून मार्ग काढण्यासाठी आरबीआयने आपल्या 150 अधिकाNयांना एका हॉटेलमध्ये ठेवले आहे. येथूनच अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्याचे काम सुरू असल्याचे वृत्त आहे.

14000 कर्मचारी वर्क फॉर्म होम

कंपन्या, र्सिव्हस सेक्टरने कर्मचाऱ्यांना वर्क फॉर्म होमचा पर्याय दिला आहे. कोरोनापासून बचावासाठी आरबीआयनेही आपल्या 14000 कर्मचाऱ्यांना वर्क फॉर्म होमची सूचना केली आहे, त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

नोटांची टंचाई टाळण्यासाठी कॅशचा वापर कमी करा

कोरोनाचा मोठा ताण बँकिंग सेक्टरवर पडला आहे. लोकांचे पैसे काढण्याचे प्रमाण वाढले आहे. एटीएममध्ये नोटांची टंचाई निर्माण होऊ नये, तसेच नोटांमधून कोरोनाचा फैलाव होण्याची भीती असल्याने लोकांनी कॅशचा वापर कमी करावा. ई-पेमेंटचा वापर वाढवावा, असेही आवाहन आरबीआयने केले आहे. दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात आरबीआयने 2.50 लाख कोटी रुपयांची लिक्विडिटी बँकिंग सेक्टरला दिली आहे. आरबीआय आता 30 हजार कोटी रुपयांचे बॉण्ड ओपन मार्वेâटमधून खरेदी करणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या