
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी देशाच्या सद्यस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. देश कठीण परिस्थितीतून जात असून मानवाधिकारांचे उल्लंघन होण्याबरोबरच देशात असहिष्णूता वाढत आहे. तसेच श्रीमंतांच्या खिशातच जास्तीत जास्त पैसा जात असल्याने गरीब- श्रीमंत यांच्यातील दरी वाढत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नवी दिल्लीत शुक्रवारी प्रणव मुखर्जी फाऊंडेशनद्वारे शांती, सद्भाव आणि प्रसन्नतेच्या दिशेने..संक्रमणापासून बदलापर्यंत या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बोलताना मुखर्जी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ज्या देशाने जगाला वसुधैव कुटुंबकम आणि सहिष्णूतेचे धडे दिले. तोच देश मानवधिकारांचे उल्लंघन, दंगली, जातीभेद यामुळे चर्चेत आला आहे. यामुळे सरकारवरचा विश्वासच उडाला आहे. असे मुखर्जी यांनी म्हटले आहे.
असहिष्णुतेवर बोलण्याची मुखर्जी यांची ही पहीलीच वेळ नसून याआधीही त्यांनी इशाऱ्यांमधून असहिष्णुतेवर भाष्य केले आहे.
Country is passing through a difficult phase. The land which gave the concept of ‘Vasudhaiva Kutumbakam’&civilisational ethos of forgiveness, tolerance&acceptance is now in news for rising intolerance, rage&infringement of human rights: Former President Pranab Mukherjee(23.11.18) pic.twitter.com/bFJ24sZCv1
— ANI (@ANI) November 24, 2018

























































