
सामना ऑनलाईन । अमरावती
राज्यात ज्या दांपत्याला दोन पेक्षा अधिक मुले होतील त्यांना इन्सेटिव्ह दिले जातील अशी घोषणा मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली आहे. तसेच दोन पेक्षा अधिक मुले असणार्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडणूकीवरील बंदीही त्यांनी उठवली आहे.
हा निर्णय कुटुंब नियोजनाच्या विरोधात आहे. हा निर्णय घेण्यामागचे कारण स्पष्ट करताना नायडू म्हणाले की, गेल्या १० वर्षात राज्यातील लोकसंख्येत १.६ टक्क्यांची घट झाली आहे. तसेच जेवढी खाणारी तोंडे असतील तितकेच कमावणारे हात हवेत.
मनुष्य बळ विकासवरील एक श्वेतपत्रिका जारी करताना नायडू म्हणाले की लोकसंख्या संतुलित करण्याची ही योग्य वेळ आहे. जेणेकरून असे होऊ नये की पुढच्या दशकात राज्यात खाणारे लोक जास्त होतील आणि काम करण्यासाठी हात कमी पडतील. राज्यात २५ वर्षाहून कमी असलेल्या तरुणांची लोकसंख्या ही ५० टक्के इतकी आहे. जर राज्यात तरुण असतील तरच तरुण प्रतिनिधी मिळतील. यावेळी नायडूंनी प्रत्येक दांपत्याला किती इन्सिटेव्हि मिळतील हे स्पष्ट केले नाही.

























































