विसर्जनात हातसफाई करणाऱ्या टोळीला शिक्षा 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनंत चतुर्दशीला गर्दीचा फायदा घेऊन भक्तांचे मोबाईल चोरी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे. संजय खारवा, सुमेश लोहकरे, लालतु तुनु डे आणि आकाश मेहरा अशी त्यांची नावे आहेत. नव्याने लागू झालेल्या कलम 122 नुसार आरोपीना शिक्षा होण्याची ही पहिलीच वेळ आहे.  गेल्या वर्षी अनंत चतुर्दशीला बासेर शेख हे गिरगाव परिसरात विसर्जन सोहळा पाहण्यासाठी आले होते. तेव्हा विसर्जन मिरवणुकी दरम्यान त्यांचा मोबाईल चोरीला गेला. मोबाईल चोरीप्रकरणी त्यांनी व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. त्याच दरम्यान काही भक्तांचे पाकीट, मोबाईल हरवल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या. पोलिसांनी शोधमोहीम हाती घेऊन आरोपींना अटक  केली.