
कोरोना प्रतिबंधक लसीची किंमत 600 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. परंतु देशी बनावटीची भारत बायोटेकने विकसित केलेली कोवॅक्सिनची किंमत त्यापेक्षा महाग आहे. कोवॅक्सीन राज्यांसाठी 600 तर रुग्णालयांसाठी 1200 रुपयांचा दर निश्चित करण्यात आला आहे.
शनिवारी भारत बायोटेकने आपली कोरोना प्रतिबंधक लस कोवॅक्सिनचे दर जरी केले आहे. त्यानुसार राज्य सरकारला 600, केंद्र सरकारला 150 तर खासगी रुग्णालयांना 1200 रुपयांत मिळणार आहे. या लसीच निर्यात दर 15-20 डॉलर ठेवण्यात आला आहे.
यापूर्वी सीरम इन्स्टिट्युटची लस कोविशील्डचे दर जारी करण्यात आले होते. कोविशील्ड आणि कोवॅक्सीनच्य्या तुलनेत भारत बायोटेकची लस महाग आहे. कोविशील्ड खासगी रुग्णालयात ही लस 600 तर राज्यात 400 रुपयांना मिळणार आहे. तर कोवॅक्सीन खसगी रुग्णालयात 1200 तर राज्यांन 600 रुपयांना मिळणार आहे.
सरकारने दिलेल्या निर्देशांनुसार आपण कोवॅक्सीनचे दर ठरवल्याचे भारत बायोटेकने म्हटले आहे. राज्य सरकारांसाठी 600 तर रुग्णालयांसाठी 1200 रुपये आकारले जातील असे भारत बायोटेकने म्हटले आहे.

























































