फरार विजय मल्ल्या ओव्हलवर प्रगटला: म्हणाला, मी मॅच पाहायला आलोय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लंडन

हिंदुस्थानी बँकांना 6 हजार कोटींचा चुना लावून फरार झालेला कर्जबुडव्या मद्यसम्राट विजय मल्ल्या रविवारी थेट लंडनच्या ओव्हल मैदानावर प्रगटला. पत्रकारांनी त्याला विचारले असता, मी हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया विश्वचषक क्रिकेट लढत पाहायला आलोय असे उत्तर मल्ल्याने दिले. 2019 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर मात करत शानदार सुरुवात केली. लंडनमधील ओव्हलच्या मैदानावर हिंदुस्थान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणाऱ्या लढतीदरम्यान, हिंदुस्थानी बँकाना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून पसार झालेल्या विजय मल्ल्यानेही हजेरी लावली आहे. एएनआय वृत्तसंस्थेने विजय मल्ल्याचे मैदानात जातानाचे फोटो शेअर केले आहेत. यावेळी विजय मल्ल्याची प्रतिक्रीया घेण्यासाठी प्रसारमाध्यमांनी प्रयत्न केला. मात्र, मी सामना पाहण्यासाठी आलो आहे, असे म्हणत मल्ल्याने अधिक काही बोलण्यास नकार दिला. दरम्यान हिंदुस्थान आणि ब्रिटन सरकारमध्ये विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी वाटाघाटी सुरु आहेत.