प्रियकराच्या साथीने मुलीनेच केली बापाची हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

प्रेमसंबंधांना विरोध करत असल्याने मुलीनेच आपल्या बापाची गळा आवळून हत्या केल्याचा संतापजनक प्रकार उत्तर प्रदेशात घडला आहे. याप्रकरणी मुलगी आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे.

उत्तर प्रदेशातील लखनऊ शहरातील अयोध्या जिल्ह्यातील सरैठा गावात ही घटना घडली आहे. दरबारी लाल असे त्या मृत इसमाचे नाव असून रंजू असे त्यांच्या मुलीचे नाव आहे. दरबारी लाल यांना चार मुली आहेत. तीन मुलींचे लग्न झाले असून लहान मुलगी अविवाहीत आहे. ती त्यांच्यासोबत राहत होती. तिचे गावातल्याच रवी नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते.

त्याबाबत दरबारी लाल यांना कळले होते. त्यांना तो तरुण आवडत नव्हता. त्यांचा तिच्या प्रेमाला विरोध होता. त्यामुळे ते तिला प्रियकराला भेटायला देत नव्हते, त्याचबरोबर तिला घरातून बाहेर पडायला देत नव्हते. वडिलांची अनेकदा मनधरणी करुनही वडिल विरोध करत असल्याने त्यांचा काटा काढायचे ठरवले.

शनिवारी वडील जेवून घराच्या बाहेर झोपले असताना रंजूने प्रियकरासोबत बकरी बांधायच्या रश्शीने त्यांचा गळा आवळला. पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक केली असून दोघांनीही त्यांचा गुन्हा कबूल केला आहे. दरबारी लाल यांचा मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी पाठवण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.