हिंदुस्थानच्या दीपा कर्माकरला सुवर्णपदक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सुमारे दोन वर्षानंतर जिम्नॅस्टिक कोर्टवर पुनरागमन साजरे करणाऱ्या हिंदुस्थानच्या दीपा कर्माकरने तुर्कीच्या मर्सिन शहरात खेळविण्यात येत असलेल्या आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक वर्ल्ड चॅलेंज कपमध्ये वॉल्ट प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे. २०१६ च्या रिओ ऑलीम्पिकमध्ये जिम्नॅस्टिक वॉल्ट प्रकारची अंतिम फेरी गाठण्याचा पराक्रम दीपाने केला होता. रिओत दीपाचे ऑलीम्पिक पदक काही गुणांनी हुकले होते. ती चौथ्या स्थानावर राहिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीपाच्या या नेत्रदीपक  कामगिरीचे ट्विट पाठवून अभिनंदन केले आहे.