
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
पती-पत्नीमधील कौटुंबिक वाद सर्वच घरात होत असतात. वाद झाल्यानंतर एकमेकांनी केलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे निराशा येते. पण ते घटस्फोटाचे कारण होऊ शकत नाही असे स्पष्ट मत दिल्ली उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. घरगुती भांडणामध्ये पत्नीने पती नामर्द असल्याचा गंभीर आरोप करत शिवीगाळ केली होती. त्यामुळे आपली मानहानी झाल्याचे सांगत पतीने न्यायालयात धाव घेतली होती.

























































