विनामास्क विमान प्रवाशांवर कारवाई करा! हायकोर्टाचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानंतरही विमान प्रवासात आणि विमानतळ परिसरात कोरोना नियमांचे पालन होताना दिसत नाही. यावर संताप व्यक्त करत कोरोनाचे नियम न पाळणाऱया बेशिस्त विमान प्रवाशांना विमानातून खाली उतरवा, प्रसंगी दंडात्मक कारवाई करा, असे सक्त निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने विमान कंपन्यांना दिले आहेत.