देशातील काही संधीसाधू सत्ताधारी नेते राज्यघटनेतील पवित्र मूल्यांना धूर्तपणे बगल देत स्वतःचा स्वार्थ साधून घेत आहेत. त्यामुळेच देशातील लोकशाही मूल्यांचे खच्चीकरण होत असल्याची खंत काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांनी नवी दिल्लीतील 70व्या संविधान दिन सोहळय़ात बोलताना व्यक्त केली.
संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये संपन्न झालेल्या संविधान दिन सोहळय़ात बोलताना प्रियंका वडेरा यांनी देशातील संधीसाधू आणि स्वार्थी राजकारण्यांवर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, आज आपण संविधान दिन मोठय़ा उत्साहाने साजरा करतोय; पण याच घटनेतील मूल्यांची शपथ घेणारे काही राजकारणी केवळ सत्ता आणि संपत्तीसाठी सत्ता मिळवण्यासाठी आटापिटा करताना दिसत आहेत. पैसा आणि बाहुबळाच्या जोरावर गोरगरीब जनतेचे हक्क पायदळी तुडवताना दिसत आहेत ही लोकशाहीची क्रूर थट्टाच म्हणावी लागेल. सत्ता मिळवण्यासाठी लोकशाही मूल्ये पायदळी तुडवणाऱया सत्ताधिशांनीच देशातील लोकशाही कमकुवत केल्याचा आरोपही प्रियंका यांनी यावेळी केला.






















































