डॉक्टरला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आपचे आमदार प्रकाश जरवाल दोषी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दक्षिण दिल्लीमधील एका डॉक्टरला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आम आदमी पार्टी (AAP) पक्षाचे आमदार प्रकाश जरवाल आणि अन्य एका साथिदाराला दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने दोषी ठरवले आहे.

दक्षिण दिल्लीतील एका डॉक्टरने आत्महत्या केली होती. डॉक्टरला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप प्रकाश जारवाल यांच्यावर लावण्यात आला होता. 2021 मध्ये न्यायालयाने आयपीसी कलम 306 (आत्महत्येस प्रवृत्त करणे), 120-B आणि इतर आयपीसी (IPC) तरतुदींनूसार प्रकाश जरवाल यांच्यावर आरोप निश्चित केले होते.

दरम्यान, दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाचे विशेष न्यायाधीश एमके नागपाल यांनी निर्णय देत प्रकाश जारवाल यांच्यासह अन्य एकाला दोषी ठरवले आहे. मात्र न्यायालयाच्या निर्णयावर प्रकाश जरवाल यांनी असहमती दर्शवली आहे. तसेच न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे त्यांनी सांगितले.