ई सिगारेट विषाएवढीच धोकादायक, बंदी घाला; तज्ज्ञांची सरकारला सूचना 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सिगारेट सोडण्यासाठी पर्यायी वापर म्हणून ई सिगारेटचा वापर केला जात आहे. मात्र, ई सिगारेट ही विषाएवढाच धोकादायक आहे. त्यावर बंदी घाला, अशी सूचना तज्ज्ञांनी केंद्र सरकारला केली आहे.

ई सिगारेटचे हे व्यसन कायमस्वरूपी घालण्यासाठी राज्य सरकारांनी एखादी विशेष योजना तयार करावी, अशी सूचना केंद्र सरकारने राज्य सरकारांना केली आहे. मात्र, ई सिगारेट ऑनलाईन तसेच नाक्यावरच्या टपरीवरही मिळू लागल्यामुळे त्याला आळा घालता आलेला नाही. त्यामुळे ई सिगारेटवर सरसकट बंदी घाला, अशी सूचना तज्ज्ञांनी केली आहे. ई सिगारेटची विक्री करणाऱया विक्रेत्यांची वेळोवेळी तपासणी करण्यासाठी विशेष योजना तयार करावी, अशी सूचनाही केली आहे.

  • केंद्रीय औषध प्रमाणन नियंत्रण संस्थेने 12 मार्चला राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना लिखित स्वरूपात कळवले की, ई सिगारेट आणि विविध चवीच्या हुक्क्यांचे उत्पादन, विक्री तसेच आयात आणि जाहिरात करण्यावर बंदी घातली पाहिजे.
  • इलेक्ट्रॉनिक अँड इन्फोर्मेशन तंत्रज्ञान खात्यानेही 2018 मध्ये ई सिगारेटच्या जाहिरातींवर बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडला होता.
  • परदेशातून आयात होणाऱया ई सिगारेट्सना औषध नियंत्रकाकडून ना-हरकत प्रमाणपत्र घेणे कायदेशीर कस्टम खात्याने बंधनकारक केले आहे.
  • हिंदुस्थानात ई सिगारेट्सची विक्री कायदेशीर होत नसल्यामुळे ई सिगारेट्सवर बंदी घालणे शक्य आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.