अक्षरा हसनचे फोटो रती अग्निहोत्रीच्या मुलाने लीक केले ?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

अभिनेता कमल हासनची धाकटी मुलगी आणि अभिनेत्री अक्षरा हसन हिचे अंतर्वस्त्रातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. या प्रकरणी तिने मुंबई पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाकडे रितसर तक्रारही दाखल केली आहे. हे फोटो तिच्या मित्रानेच लीक केले असावेत असा पोलिसांना संशय होता. आत्तापर्यंतच्या चौकशीमध्ये हे फोटो रती अग्निहोत्रीचा मुलगा तनुज विराणी याने लीक केले असावेत असा पोलिसांना संशय यायला लागला आहे. अक्षरा आणि तनुज विराणी हे काही वर्षांपूर्वी एकमेकांच्या प्रेमात होते आणि त्यावेळी हे फोटो अक्षराने फक्त तनुजला पाठवले होते असं सांगितलं जातंय. पोलिसांना तनुजवर असलेला संशय खरा आहे का खोटा याची शहानिशा करण्यासाठी वर्सोवा पोलिसांनी तनुजला चौकशीसाठी बोलावण्याचं ठरवलं आहे.

अक्षरा हासनने फोटो व्हायरल झाल्यानंतर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती, तिने मुंबई पोलिसांना हे फोटो कोणी व्हायरल केलेत याचा मुळापर्यंत जाऊन शोध घेण्याची विनंती केली होती. एक इंग्रजी दैनिकाने या फोटोंबाबत तनुज विराणीला विचारणा केली होती. या दैनिकाला दिलेल्या माहितीमघध्ये त्याने आपल्याकडे अक्षराचे फोटो नसल्याचं सांगितलं होतं. तनुज विराणीची आई रती अग्निहोत्री आणि अक्षरा हासनचे वडील कमल हासन यांनी बॉलीवडूमध्ये ‘एक दुजे के लिए’  चित्रपटातून पदार्पण केलं होतं. यानंतर या दोघांनी बऱ्याच चित्रपटात एकत्र काम केलं आहे.