गुन्हेगारी जगताचा वेध घेणारी ‘धारावी बँक’

प्रयोगशील दिग्दर्शकांच्या यादीत समित कक्कड यांचे नाव येते. ‘हुप्पा हुय्या’, ‘हाफ तिकीट’, ‘आयना का बायना’, ‘आश्चर्यचकित’, ‘इंदौरी इश्क’, ‘36 गुण’ यांसारख्या वेगळय़ा धाटणीच्या चित्रपटांतून हे दिसून आले आहे. त्यांची ‘धारावी बँक’ ही हिंदी वेबसीरिज शनिवारपासून ‘मॅक्स प्लेयर’वर प्रदर्शित झाली आहे. अभिनेता सुनील शेट्टी या सीरिजच्या माध्यमातून ओटीटी विश्वात पदार्पण केले आहे.

 आशिया खंडातली सर्वात मोठी झोपडपट्टी ही धारावीची ओळख असली तरीही त्यापलीकडे तिच्या अंतरंगात बऱयाच गोष्टी दडल्या आहेत. या गोष्टींचा मागमूस बाहेरच्यांना लागत नाही. दारिद्रय़, गुन्हेगारीचे जाळे यांच्या विळख्यात अडकलेली धारावी मोठय़ा उद्योगांचे पेंद्रसुद्धा आहे हे सांगत तिथल्या विश्वाची वेगळी बाजू मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक कक्कड यांनी ‘धारावी बँक’ या आगामी हिंदी वेबसीरिजमध्ये केला आहे.