डॉक्टरची विष पिऊन आत्महत्या, धक्का बसलेल्या पत्नीने 2 मुलींसह पाण्याच्या टाकीत घेतली उडी

हरयाणातील रोहतक येथे एका डॉक्टरने विष प्राशन करून आत्महत्या केली. पतीच्या आत्महत्येचे वृत्त कळताच पत्नीने दोन मुलींसह पाण्याच्या टाकीत उडी घेतली. यात पत्नी व एका मुलीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला तर एक मुलगी पोहत बाहेर आल्याने तिचा जीव वाचला.

‘दै. भास्कर’ दिलेल्या वृत्तानुसार, डॉक्टर प्रमोद सहारण रोहतक येथील हेल्थ युनिव्हर्सिटीच्या नर्सिंग कॉलेजमध्ये प्रोफेसर होते. बुधवारी सायंकाळी 6 वाजता कन्हेली गावाजवळ त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. डॉक्टरांच्या खिशात पोलिसांना विषाच्या 5 पुड्या सापडल्या. त्यांच्या मृतदेहाजवळ सुसाईड नोटही मिळाली, मात्र यात आत्महत्येचे कारण स्पष्ट करण्यात आले नाही.

पती प्रमोदच्या आत्महत्येचे वृत्त कळताच धक्का बसलेल्या मीनाक्षी दोन्ही मुलींना स्कुटरवर घेऊन घराबाहेर पडल्या. यानंतर सोनिपत रोड वरील पाण्याच्या टाकीत त्यांनी दोन्ही मुलींसह उडी घेतली. मीनाक्षी आणि त्यांच्या छोट्या मुलीचा बुडून मृत्यू झाला, मात्र मोठी मुलगी पोहत बाहेर आल्याने तिचा जीव वाचला.

दरम्यान, डॉक्टर प्रमोद यांच्या सुसाईड नोटमध्ये ‘धावपळीच्या आयुष्याचा कंटाळा आला आहे. माझ्या मृत्यूला देवच जबाबदार असून पोलिसांनी अन्य कोणालाही जबाबदार धरू नये’, असे लिहिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या