वाटचाल सहा दशकांची… डॉ. अलिमिया परकार यांच्या आत्मकथनाचे आज प्रकाशन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डॉ. अलिमिया परकार यांचे ‘वाटचाल सहा दशकांची’ या आत्मकथनपर पुस्तकाचे प्रकाशन उद्या, 30 डिसेंबर रोजी सायंकाळी 4.30 वाजता राधाबाई शेट्टे सभागृह, रत्नागिरी येथे होणार आहे.

गेली पंचवीस वर्षे मी डॉ. अलिमिया परकार यांच्यासोबत अनेक गुंतागुंतीच्या रुग्णांच्या उपचारांचा अनुभव घेतला आहे. या सर्व उपचारांचा अनुभव माझ्या गाठीशी आहे. त्यातील काही मोजक्या अनुभवांची आठवण डॉ. शिरीष शेणई यांनी आज करून दिली.

पुस्तक प्रकाशन सोहळ्याला कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर, केईएम हॉस्पिटलचे माजी अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, डॉ. रमेश चव्हाण, कोमसापच्या अध्यक्षा नमिता कीर, आर.ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन, मानसोपचारतज्ञ डॉ. शाश्वत शेरे, प्रकाश कामत उपस्थित राहणार आहेत.