
मराठी नाटक समूह या व्हॉट्सऍप ग्रुपच्या माध्यमातून 3 जून रोजी एकदिवसीय प्रायोगिक नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. हा महोत्सव दादर येथील शिवाजी मंदिरात सकाळी 10 वाजल्यापासून सुरु होणार आहे. ह्या महोत्सवात झी नाट्य गौरव, मटा सन्मान आणि महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा, कामगार कल्याण स्पर्धा अशा विविध स्पर्धांमध्ये नामांकनं मिळालेले, पारितोषिक विजेत्या नाटकांचे प्रयोग सादर होणार आहेत. महोत्सवाचे उद्घाटन पद्मश्री प्रा. वामन केंद्रे ह्यांच्याहस्ते होणार आहे. या महोत्सवात सुप्रसिद्ध नाटककार चं. प्र. देशपांडे यांना जीवनगौरव पुरस्कार, अभिनेत्री निर्मिती सावंत यांना कै.शरद तळवलकर स्मृती पुरस्कार, ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे यांना कै. प्र. ल. मयेकर स्मृती पुरस्कार, चंद्रकांत काळे यांना प्रदीर्घ कारकीर्द योगदानाबद्दल प्रायोगिक रंगभूमी पुरस्कार, विद्या पटवर्धन यांना बालरंगभूमीवरील प्रदीर्घ कारकीर्द योगदानासाठी, तर प्रदीप वैद्य यांना प्रायोगिक रंगभूमी योगदानासाठी पुरस्कार देऊन सन्मानि केल जाईल.

























































