
सामना प्रतिनिधी । मुंबई
मराठा आरक्षण मंजूर होईपर्यंत थांबविलेली 72 हजार पदांची सरकारी मेगाभरती तत्काळ सुरू करण्यात येईल अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. यामुळे मराठा समाजातील तरुणांचा नोकरीचा मार्ग आता यामुळे खुला होईल. विरोधकांनी उपस्थित केलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना ते बोलत होते.
‘सनातन’चा प्रस्ताव केंद्रात
‘सनातन’ संस्थेवरील बंदीचा प्रस्ताव आघाडीच्या काळातच केंद्र सरकाकडे पाठवला असून तो प्रलंबित आहे. बंदीचा निर्णय केंद्र सरकार घेते. डावे असो किंवा उजवे, कोणाच्याही पाठीशी आम्ही उभे राहणार नाही. चुकीच्या गोष्टींच्या मागे राज्य सरकार उभे राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.


























































