ड्रग्ज प्रकरण : दीपिकाची उद्या होणार चौकशी

ड्रग्ज प्रकरणी अभिनेत्री दीपिका पदुकोणची शनिवारी चौकशी होणार आहे. तर शुक्रवारी राकुल प्रीत सिंग आणि करिश्मा प्रकाशची चौकशी केली जाणार आहे. आज एनसीबीने सिमोन खंबाटा आणि श्रुती मोदींची चौकशी केली.

अभिनेत्री दीपिका पदुकोणला एनसीबीने चौकशीसाठी समन्स बजावले होते. तिची शुक्रवारी एनसीबीच्या कार्यालयात चौकशी केली जाणार होती. पण आता तिची शनिवारी एनसीबीचे अधिकारी चौकशी करणार आहेत. शुक्रवारी रकुल प्रीत सिंग आणि करिश्माला समोरासमोर बसवून चौकशी केली जाईल. त्या दोघींच्या चौकशीनंतर एनसीबीला माहिती मिळेल. त्यावरून एनसीबी दीपिकाला प्रश्न विचारतील. आज फॅशन डिझायनर सिमोन खंबाटा आणि श्रुती मोदी या चौकशीसाठी एनसीबीच्या कुलाबा येथील गेस्ट हाऊसमध्ये आल्या होत्या. सिमोनची दुपार पर्यंत तर श्रुतीची सायंकाळ पर्यंत एनसीबीने चौकशी केली. तर दुसरीकडे एनसीबीने सनम जोहर आणि अबीगेल पाडेंची सलग दुसऱ्या दिवशी चौकशी केली. पुन्हा त्या दोघांची एनसीबी चौकशी करणार आहे. तर एका प्रसिद्ध प्रॉडकशन हाऊसच्या मॅनेजरला देखील शुक्रवारी चौकशीसाठी एनसीबीने बोलावले आहे.

सुशांतने नशेची सवय पूर्ण करण्यासाठी आमचा वापर केला
रियाने सुशांतवर गंभीर आरोप केले आहेत. सुशांत ड्रग्ससाठी सर्वांचा वापर करायचा. इतरांप्रमाणे त्याने माझा आणि माझ्या भावाचाही ड्रग्ससाठी वापर केला आहे असे रियाने आपल्या जामीन अर्जात म्हटले आहे. रिया आणि शोविकने अॅड. सतीश मानेशिंदे यांच्या मार्फत हायकोर्टात जामीनासाठी अर्ज केला आहे. या दोघांच्या जामीन अर्जावर न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी घेण्यात आली त्यावेळी एनसीबीने उत्तर देण्यासाठी कोर्टाकडे वेळ मागून घेतला त्यामुळे या दोघांच्या याचिकेवर इतर आरोपींसह 29 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या