उन्हाळ्यात किचनमध्ये उभं राहवत नाही…हे करून पहा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उकाड्यात कीचनमध्ये उभे राहून स्वयंपाक करणे कठीण जाते.

अशा वेळी स्वयंपाकाचे नीट नियोजन आखले पाहिजे.

उन्हाळ्यात हलके आणि झटपट तयार होतील असे पदार्थ करा.

इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर करा.

किचनमध्ये एक्झॉस्ट फॅनचा वापर करा.

त्यामुळे घरातील गरम हवा बाहेर फेकली जाते.

हवा खेळती राहते. किचनमध्ये सिलिंग फॅन असेल तरीदेखील टेबल फॅन ठेवा.

यामुळे किचनचे वातावरण थंड राहील.