
उत्तर प्रदेश राज्यात बलात्कार आणि छेडछाडीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशीच एक घटना बांदा जिल्ह्यामध्ये घडली असून एका 8 वर्षांच्या मुलावर शेजारी राहणाऱ्या तरुणानेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
ही घटना उत्तर प्रदेश राज्यातील बांदा जिल्ह्यात घडली आहे. बाबेरु कोतवाली भागात राहणारा 8 वर्षांचा मुलगा 18 डिसेंबरला संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास कुटुंबातील काहीजणांना आणण्यासाठी बसस्थानकावर जात होता. त्याचवेळी शेजारी राहणाऱ्या तरुणाने पीडित मुलाला चॉकलेटचे आमिष दाखवले आणि त्याला निर्जनस्थळी नेले. आरोपीने पीडित मुलाचे तोंड दाबले आणि त्याच्यावर अत्याचार केला. मुलाने आरडा-ओरडा करायला सुरुवात करताच आरोपी पळून गेला.
घाबरलेल्या अवस्थेत मुलगा घरी आला आणि घडलेल्या घटनेबद्दल कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी शेजारी राहणाऱ्या आरोपीला जाब विचारला. यावेळी दोन्ही कुटुंबामध्ये शाब्दिक खडाजंगी झाली. आरोपीच्या कुटुंबीयांनी पीडित मुलाच्या कुटुंबीयांनाच धमकवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पीडित मुलाच्या कुटुबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी केली.
पोलिसांनी आरोपीच्या विरोधात पोक्सो (POCSO) आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. बाबेरुचे पोलीस अधिकारी पंकज कुमार सिंह यांनी सांगितले की, मुलाच्या कटुंबीयांच्या तक्ररीनुसार आरोपी तरुणाविरुध्द संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपीला अटक करुन तुरुंगा पाठवण्यात आले आहे. पुढील तपास सुरु असून आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.






















































