पश्चिम उपनगरात आज रात्री आठ तास वीज गूल होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
electricity-1

सामना प्रतिनिधी, मुंबई

मेट्रोच्या कामामुळे चारकोप येथील टाटा पॉवरच्या उच्च दाब वीजवाहिनीचे मोनोपोलमध्ये रूपांतरित करण्याचे काम उद्या शनिवारी रात्री 11 वाजल्यापासून पुढील आठ तास करण्यात येणार आहे. त्यामुळे पश्चिम उपनगराच्या कांदिवली पश्चिम, मालाड पश्चिम, गोरेगाव पश्चिमसह अंधेरीच्या काही भागांत आठ तास वीज गूल होण्याची शक्यता आहे. मेट्रो मार्ग क्रमांक 2 अ दहिसर ते डी.एन. नगरचे विस्तारित काम सध्या जोरात सुरू आहे.

टाटा पॉवरची 110 केव्हीची उच्च दाब वाहिनी येथूनच जात आहे. त्यामुळे तिचे चारकोप येथे मोनोपोलमध्ये रूपांतरित केले जाणार आहे. हे काम रविवारी सकाळी 7 वाजेपर्यंत चालणार आहे. त्यामुळे काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे. दरम्यान, वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून टाटा पॉवर आणि अदानी इलेक्ट्रिसिटीने पर्यायी वीजवाहिनीवरून वीजपुरवठा सुरू ठेवण्याची तयारी केली आहे.