कलम 50 नुसार ईडीला अटक करण्याचा अधिकारच नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सरकारच्या हातचे बाहुले बनून विरोधी पक्षांतील नेत्यांना ऊठसूट अटक करणाऱ्या ईडीला दिल्ली उच्च न्यायालयाने आज चांगलेच खडसावले. ईडीला पीएमएलएच्या कलम 50 अंतर्गत कोणत्याही व्यक्तीला अटक करण्याचा अजिबात अधिकार नाही. ईडी फक्त त्या व्यक्तीला समन्स देऊ शकते किंवा कागदपत्रे तपासू शकते, इतकाच त्यांना अधिकार आहे, असे महत्त्वाचे निरीक्षण दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी नोंदवले.

पीएमएलएच्या कलम 50 अंतर्गत कोणत्याही व्यक्तीला समन्स जारी करणे, कागदपत्रांची तपासणी करणे, स्टेटमेंट रेकॉर्ड करण्याचा अधिकार आहे. ज्याप्रमाणे दिवाणी न्यायालयाला अधिकार असतो तितकाच अधिकार ईडीला आहे, असे दिल्ली उच्च न्यायालयाने नमूद केले. हे अधिकार असले तरी ईडीला कोणत्याही व्यक्तीला अटक करण्याचा अधिकार अजिबात नाही, असे न्यायालयाने नमूद केले. ईडीने 2020 मध्ये आशीष मित्तल यांच्याविरुद्ध ईसीआयरअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. याविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती.