वयाच्या 12 व्या वर्षापासून खरेदी करत होता ‘बिटकॉइन’, 18 व्या वर्षांत झाला कोट्याधीश!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिटकॉईन एक क्रिप्टो करन्सी असून यामुळे अनेक लोक रातोरात कोट्याधीश झाले आहेत. सध्या एक बिटकॉइनची किंमत 50 लाख रुपये इतकी आहे. बिटकॉइनमुळे जे कोट्याधीश झाले त्यातच एक ‘एरिक फिनमॅन’ देखील आहे. फिनमॅनचे म्हणणे आहे की, बिटकॉईनमुळे करोडपती बनणारा तो सर्वात तरुण व्यक्ती आहे.

एरिक फिनमॅनकडे गेल्या 10 वर्षणापासून असलेल्या 100 बिटकॉइन मूल्य आता 50 कोटी रुपयांच्या जवळ पोहोचले आहे. हे 100 बिटकॉइन एरिकने सुमारे एक हजार डॉलर्स म्हणजेच 47 हजार रुपयांना विकत घेतले होते. एरिकने बिटकॉईन विकत घेण्यास सुरुवात केली त्यावेळी तो फक्त 12 वर्षांचा होता.

एरिक फिनमॅनने वयाच्या 12 व्या वर्षी आपली पहिली गुंतवणूक केली आणि 18 व्या वर्षी कोट्याधीश झाला. 2011 मध्ये वयाच्या 12 व्या वर्षी एरिकने 10 डॉलर किमतीचे बिटकॉइन खरेदी केले. वयाच्या 15 व्या वर्षी एरिकला शाळेतून काढून टाकण्यात आले. यानंतर त्याने 100 बिटकॉईन खरेदी केले. पुढे त्याने एज्युकेशन स्टार्टअप बॉटंगलची स्थापना केली. 17 व्या वर्षी त्याने बॉटंगल विकले. दरम्यान, याच वर्षीय एरिकने आपला स्वतःचा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. ज्याला फ्रीडम फोन असे म्हटले जात आहे.