माजी खासदार डॉ. गुणवंतराव सरोदे यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । सावदा

जळगाव जिल्ह्यातील भाजपचे पहिले आमदार व खासदार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ सदस्य डॉ. गुणवंतराव रामभाऊ सरोदे (78) यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. माजी खासदार डॉ. गुणवंतराव रामभाऊ सरोदे यांच्यावर सावदा येथे दुपारी शोकमय वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

सावदा येथील राहत्या घरून डॉ. सरोदे यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. भारतेश्वर मंदिराजवळील शेतात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. सरोदे यांच्या पश्चात मुलगा, सून, दोन मुली, नातवंडे असा परिकार आहे. डॉ. गुणवंत सरोदे यांचा जन्म रावेर तालुक्यातील मस्कावद येथे 3 एप्रिल 1940 ला झाला. वैद्यकीय (एमबीबीएस) शिक्षण त्यांनी पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर रावेर तालुक्यातील सावदा येथे वैद्यकीय सेवा सुरू केली. ग्रामीण भागातील गरीबांचा डॉक्टर म्हणून त्यांना ओळखले जायचे.